Representative Image (Photo Credits: RawPixel)

Viagra Overdose And Heart Attack: लैंगिक सुख मिळविण्यासाठी हपापलेल्या तरुणाने केलेली कृत्रिम धडपड त्याच्या जीवावर बेतली आहे. मैत्रिणीसोबत लॉजवर परफॉर्मन्स दाखविण्याच्या नादात या तरुणाने अतिप्रमाणात "व्हायग्रा" (Viagra) गोळ्यांची मात्रा घेतली. ज्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही घटना भंडारा मध्यवर्ती बसस्थानकालगत असलेल्या हिरणवार लॉजवर घडली. प्राप्त माहितीनुसार तरुण नागपूर येथील आणि तरुणी गोंदिया जिल्ह्यातील आहे. दोघांमध्ये झालेल्या ओळखीतून मोबाईलवर लडीवाळ संवाद सुरु झाला. ज्यातून पुढे दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले.

लॉजवर एक रात्र सोबत घालविण्याच्या उद्देशाने एकत्र

मृत तरुण अवघा 27 तर त्याची मैत्रिण असलेली तरुणी 23 वर्षांची आहे. काही काळापूर्वी दोघांमध्ये काही कारणांनी भेट झाली. या भेटीचे रुपांतर पुढे मैत्री आणि मोबाईलवरील संवादात झाले. त्यातून जवळीक वाढली आणि दोघे परस्परांच्या प्रेमात ओढले गेले. त्यातूनच मग गाठभेठ ठरली. भविष्यात विवाह करण्याच्याही आणाभाका घेतल्या गेल्या. मग काय, दोघांनीही एक दिवस निश्चित केला आणि भेटायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे तरुन नागपूर आणि तरुणी गोंदिया येथून निघाली. त्यांनी भंडारा हे ठिकाण निश्चित केले. दोघेही भंडारा शहरात दिवसभर भटकले. खरेदी केली. काही ठिकाणी छान पदार्थांचा अस्वादही घेतला आणि मग एक रात्र सोबत घालविण्याच्या उद्देशाने मग दोघेही लॉजच्या शोधात भंडारा मद्यवर्थी बसस्थानकाजवळ पोहोचले. बसस्थानकाला लागूनच असलेल्या हिरणवार लॉजवर दोघांनी मुक्काम ठोकला.

व्हायग्रा गोळी कशी घ्यावी? त्याला कळलेच नाही

दरम्यान, एकांत मिळाल्याने जोरदार बॅटींग करण्याच्या उद्देशाने दोघेही सुखावले. त्यातच तरुणाने अधिक उताविळ होत मेडीकलमधून खरेदी केलेल्या "व्हायग्रा" (Viagra) या शक्तीवर्धक (लैंगिक) गोळीची मात्रा घेतली. मात्र, ती घेताना त्याने स्वत:वरचे नियंत्रण गमावले आणि एक 100 mg गोळी घेण्याऐवजी त्याने एकत्रच दोन गोळ्या घेतल्या. ज्यामुळे तरुणावर अतिरिक्त ताण निर्माण झाला. त्यातच त्याला रक्तदाब (Blood Pressure) वाढल्याने हृदयविकाराच झटका आला आणि तो कोसळला. त्याचे अंगही थंडगार पडले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

मैत्रिणीने प्रसंगावधान राखत लॉजवरील कर्मचाऱ्यांची मदत घेतली. तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापुर्वीच मृत घोषीत केले. भंडारा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अधिक तपास सुरु केला आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक माहिती पुढे येणार आहे.