आता या देशातील स्त्रियांची कामोत्तेजना अजून वाढणार; मिळाली फिमेल व्हायग्राला परवानगी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Addyi)

जगामध्ये स्त्रियांसाठी व्हायग्राची (Female Viagra) परवानगी देणारा इजिप्त (Egypt) हा पहिला देश ठरला आहे. एक अरब आणि संस्कृतीच्या पगड्याखाली दबला असूनही इजिप्तने हे मोठ पाऊल उचलले आहे. इजिप्तमध्ये स्त्रियांची कामोत्तेजना वाढवणाऱ्या औषधांचे उत्पादन आणि विक्री लवकरच सुरु होईल. जगात पुरुषांसाठी कामोत्तेजना वाढवणारी अनेक औषधे उपलब्ध आहेत मात्र स्त्रियांसाठी असे कोणतेही औषध उपलब्ध नाही. मात्र आता इजिप्त देशात असे औषध तयार होऊन विकले जाणार आहे.

इजिप्त देशाने इतका मोठा निर्णय घेण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या देशात होत असलेले घटस्फोट हे आहे. या देशांत घटस्फोटाचे प्रमाण बरेच वाढले आहे, यामागे घरगुती समस्या तर आहेतच मात्र त्यात आता पती पत्नीमधील शारीरिक समस्या हे कारण देखील समोर आले आहे. या देशात स्त्रियांची सेक्स लाईफ अतिशय खराब आहे. 10 मधील 3 स्त्रिया या घरगुती कारणाने त्रासलेल्या असतात, तसेच इतर अनेक गोष्टींमुळे त्यांना नैराश्येचा सामना करावा लागतो. या गोष्टींचा परिणाम त्यांच्या सेक्स लाईफवर होतो. म्हणूनच अशा प्रकारच्या व्हायग्रा गोळ्यांची निर्मिती आणि विक्री यांचा प्रस्वात मांडण्यात आला होता, त्याला मंजुरी मिळाली आहे.

वाढते घटस्फोट रोखण्यासाठी सरकारने जरी विचित्र निर्णय घेतला असेल तरी त्याला प्रचंड विरोधही होत आहे. अनेक मुस्लीम संघटना याला हराम म्हणत आहेत. दुसरीकडे अनेक एक्सपर्ट्सनी हे औषध सल्ल्याविना न घेण्याचा इशारा दिला आहे. एक्सपर्ट्सच्या मते येथील महिला लाज आणि निर्बंधांमुळे डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच या औषधाचे सेवन करत आहेत, ते अत्यंत धोकादायक आहे. एका फार्मासिस्टच्या मते या औषधामुळे व्यक्तीचे ब्लड प्रेशर अत्यंत कमी जास्त होऊ शकते. यामुळे हार्ट आणि किडनीवर वाईट परिणाम होतो. यामुळेच ब्लड प्रेशर आणि हार्टची समस्या असणाऱ्यांनी यापासून दूर राहायला हवे.