
वासनेची भूक मिटवण्यासाठी कोणती व्यक्ती कोणता मार्ग अवलंबेल काही सांगता येत नाही. स्त्रियांवरील अत्याचाराच्या अनेक घटना रोज कानी पडत असताना आता मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराच्याही बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये 57 वर्षीय सॅंटियागो व्हिक्टोरियाला (Santiago Victoria) पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीवर घोडीसोबत (Miniature Horse) अश्लील कृत्य (Sex) केल्याचा आरोप आहे. CCTV मध्ये या व्यक्तीने केलेले घाणेरडे कृत्य कैद झाले आहे, त्याआधारे सॅंटियागोला अटक करण्यात आली.
पाळीव प्राण्यांचे मालक अगदी स्वतःच्या मुलांप्रमाणे या प्राण्यांवर प्रेम करतात. या प्राण्यांना काही झाले तर त्याचा मालकाला फार वाईट वाटते. जेव्हा कॅथरीन एंजेल (Catherine Engel) ला समजले की तिच्या पाळीव घोडीसोबत एका व्यक्तीने अश्लील कृत्य केले आहे तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या वर्षी 18 सप्टेंबर रोजी कॅथरीनला तिच्या एका घोडीच्या गळ्यात दोरी बांधलेली दिसली. कॅथरीनने यापूर्वी कधीच तिच्या घोड्याच्या गळ्यात दोरी बांधली नव्हती, त्यावरून तिच्या लक्षात आले की तबेल्यामध्ये कोणीतरी येऊन गेले आहे.
तिने ताबडतोब आपले सीसीटीव्ही कॅमेरे बघितले व ते पाहून तिला धक्काच बसला. कॅथरीनने पाहिले की एका व्यक्तीने रात्री उशिरा तबेल्यात प्रवेश केला आणि एका घोडीवर बलात्कार केला. काही वेळानंतर सँटियागो तेथून निघून गेला पण नंतर तो पुन्हा आला आणि त्याने पुन्हा घृणास्पद कृत्याची पुनरावृत्ती केली. यानंतरही त्याचे मन भरले नाही व तो पुन्हा तिसऱ्यांदा तिथे परत आला आणि त्याने त्याच घोडीशी अश्लील चाळे केले. (हेही वाचा: Dog Rape: भटक्या कुत्र्यांवर बलात्कार करणारा 'बाबुराव' पोलिसांच्या ताब्यात)
कॅथरीनने सुमारे 10 दिवसांनंतर पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. 5 ऑक्टोबर रोजी कॅथरीनने पोलिसांना सांगितले की, आरोपी एका वेल्डिंग कंपनीत काम करत असून तो त्याची गाडी तबेल्याजवळच पार्क करत असे. जेव्हा पोलिसांनी सॅंटियागोला अटक केली, तेव्हा त्याने आपला गुन्हा काबुल केला. परंतु त्याने घोडीशी किती वेळा अश्लील कृत्य केले हे त्याला आठवत नाही. सध्या, सँटियागो तुरुंगात आहे आणि त्याला 56 लाख रुपयांच्या बॉन्डवर अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला आहे.