DOG |

पुणे (Pune ) येथून एक धक्कादायक वृत्त आहे. एका इमारतीच सुरक्षा रक्षक ( Security Guard) म्हणून काम करणाऱ्या इसमाने भटक्या कुत्रीवर (, Female Dog) बलात्कार (Dog Rape) केल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार बाबुराव मोरे असे या इसमाचे नाव आहे. तो 65 वर्षांचा आहे. चतुश्रृंगी पोलीस स्टेशन दप्तरी बाबुराव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बिगरशासकीय सेवाभवी संस्थेसोबत काम करणाऱ्या महिलेला आरोपीबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर या महिलेने संस्थेच्या मदतिने आरोपीवर पाळत ठेवली. त्यानंतर घटना उघडकीस आली. पोलिसांच्या मदतीने आरोपीला जेरबंद करण्यात आले.

भटक्या कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार करणारा हा बाबुराव गेल्या भलताच निर्ढावला होता. गेल्या काही काळापासून तो असे कृत्य करत असल्याची माहिती एका महिलेला मिळाली होती. ही महिला एका बिगरशासकीय सेवाभावी संस्थेसोबत काम करते. संबंधित महिलेने तिच्या संस्थेला याबाबत माहिती दिली. मग या संस्थेच्या पथकाने बाबुराव काम करत असलेल्या परिसरात एक सीसीटीव्ही कॅमेरा लावला आणि त्याच्यावर पाळत ठेवली. अल्पावधीच बाबुराव त्याच्या कृत्यासह रंगेहातपणे सापडला. (हेही वाचा, धक्कादायक! दोन तरुणांचा पाळीव कुत्र्यावर पाशवी बलात्कार; रोज होणाऱ्या अत्याचारामुळे जनावराचा मृत्य)

संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवत बाबुरावला अटक केली. तसेच, पीडित श्वानाची वैद्यकीय तपासणी केली असता श्वानासोबत असा प्रकार घडल्याचे पुढे आले. बाबुरावर मोरे याच्यावर प्राण्यांना क्रुरतेने वागविल्याविरधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.