Vayu Cyclone: पुढील 24 तासात मुंबई, ठाणे, कोकण परिसरात मुसळधार पावसाची शक्यता
File Photo (Photo Credits: ANI)

 Cyclone Vayu Alert: अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला होता. आता या चक्रीवादळाला 'वायू'(Vayu) असं नाव देण्यात आलं असून उद्या (11 जून) दिवशी हे कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वायू चक्रीवादळामुळे उद्या मुंबई, ठाणेसह कोकण परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने या काळात मच्छिमार्‍यांनी अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. चक्रीवादळांची नावं कोण आणि कशी ठरवतात ?

रविवारी (9 जून) दिवशी मुंबईत काही भागामध्ये वीजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह मान्सूनपूर्व सरी बसरल्या. मात्र वायू चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीवर उद्या मुसळधार पाऊस पडू शकतो. वायू चक्रीवादळ किनारपट्टीपासून 300 किमी दूर असल्याने त्याचा थेट धोका नसला तरीही किनारपट्टीवर वादळी वारे वाहू शकतात त्यामुळे मच्छीमार्‍यांसह किनारपट्टीवर राहणार्‍या नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई मध्ये लवकरच मान्सून दाखल होणार; BMC कडून 180 ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता व्यक्त

अरबी समुद्रातील दक्षिणपूर्व भाग, लक्षद्वीप आणि मध्यपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस पडणार आहे.