Vashi | X @TOI

नवी मुंबईत (Navi Mumbai) वाशी (Vashi) मध्ये एक मानसिक रूग्ण महिला 35 फूट उंच एका शिल्पावर चढल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना वाशी सेक्टर 17 मधील आहे. विशी मधील ही महिला महाराष्ट्राच्या बाहेरील आहे. ट्राफिक आयलंड जवळ असलेल्या या शिल्पावर चढून ती एका वेगळ्याच लहेजामध्ये बोलत होती. वाशी पोलिसांनी तब्बल तासाभराच्या प्रयत्नांनंतर तिला खाली सुखरूप उतरवले आहे.

पनवेलच्या SEAL Ashram या एका सामाजिक संस्थेने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांच्या मदतीने आता तिची कुटुंबासोबत पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. TOI च्या वृत्तानुसार, ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असली तरीही पेहरावावरून शिक्षित आणि महाराष्ट्राबाहेरील वाटत आहे. सध्या या महिलेचे काऊंसलिंग करून तिच्याकडून माहिती काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सामाजिक संस्थेने म्हटलं आहे.

वाशीमध्ये शिल्पावर चढली महिला

SEAL या सामाजिक संस्थेने 25 वर्षात आतापर्यंत 520 बेघर झालेल्या लोकांना पुन्हा आपल्या लोकांपर्यंत पोहचवले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या महिलेला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र मानसिकदृष्ट्या ती स्थिर नाही.