Vasai: धावती रेल्वे गाडी पकडणे पडले असते महागात, स्थानकात कार्यरत असलेल्या पोलिसांनी वाचवला जीव (Watch Video)
Mumbai local (Photo Credits: Wikimedia Commons)

Vasai: वसई रेल्वे स्थानकात धावती लोकल पकडणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले असते. परंतु सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. सदर व्यक्ती लोकल पकडण्यासाठी धावली त्याचवेळी त्याचा पाय निसटला गेला. परंतु स्थानकात कार्यरत असलेल्या रेल्वे पोलिसांनी तातडीने व्यक्तीच्या येथे धाव घेत त्याचा जीव वाचवला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.(Palghar Beach Accident: पालघर बीचवर थरारक अपघात, भरधाव कारने सहा जणांना चिरडले, एकाचा मृत्यू, 5 गंभीर जखमी)

न्यूज18 नेटवर्क यांनी दिलेल्या बातमीनुसार, स्थानकात कार्यारत असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्याचा जीव वाचवला. धावती ट्रेन पकडू नये असे आवाहन नागरिकांना वारंवार केले जाते. परंतु रेल्वे पकडताना खाली पडल्याच्या घटना यापूर्वी सुद्धा समोर आल्या आहेत.(ठाणे: भिवंडी मध्ये वीटभट्टी मजुराच्या घरावर कोसळला ट्रक; 3 चिमुकलींचा मृत्यू)

Tweet:

कल्याण स्थानकात चालत्या ट्रेनमधून खाली उतरताना एका व्यक्ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये अडकला गेला. त्याचवेळी एका पॉइंटमॅनची नजर त्याच्यावर पडते आणि तो त्याला वाचवण्यासाठी धावत जातो. यामुळे आता त्या पॉइंटमॅनचे कौतुक करण्यात आले होते.