Palghar Beach Accident: पालघर बीचवर थरारक अपघात, भरधाव कारने सहा जणांना चिरडले, एकाचा मृत्यू, 5 गंभीर जखमी
Road Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पालघर बीचवर (Palghar Beach Accident) एका भरधाव कारने चक्क सहा जणांना चिरडले आहे. या धक्कादायक अपघातात (Palghar Accident) एकाचा मृत्यू झाला आहे तर उर्वरीत पाच जण गंभीर जखमी आहेत. पालघर जिल्ह्यातील चिंचणी बीचवर (Chinchani Beach) ही घटना घडली. जखममींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत मात्र त्यांची प्रकृती चिंताजणक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस (Palghar Police)तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.

प्रजसत्ताक दिनादिवशी (26 जानेवा) पालघर बीचवर ही घटना घडली. प्राप्त माहिती अशी की, पालघर येथील चिंचणी बीचवर नेहमीप्रमाणेच पर्यटक हजर होते. त्यात 26 जानेवारी हा सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची संख्या आणखी वाढली. दरम्यान, एक माथेफिरु कार भरधाव वेगाने चालवत तिथे आला आणि त्याने सहाजणांना चीरडले. हे सहा जण पर्यटक असून, फिरण्यासाठी ते येथे आले होते. कारची धडक बसल्याने हे सहाही जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, घडलेली घटना लक्षात येताच याच ठिकाणी फिरावयास आलेल्या इतर पर्यटकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. जखमींना जवळच्याच चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. (हेही वाचा, New Year Gift: पालघरने Transgenders ना जाहीर केली 12,000 रुपयांची वार्षिक आर्थिक मदत; ठरला पहिला जिल्हा)

दरम्यान, घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी कार चालकांना घेराव घातला आणि ताब्यात घेतले. काहीच वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चालकाला बेड्या ठोकल्या. उपचार सुरु असलेल्या सहापैकी एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर इतर पाच जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती आहे. माथेफिरु चालकाच्या बेफीकीरपणाचा फटका सहा पर्यटकांना बसला. त्यात एकाचा प्राण गेला. एक छोटीशी चूक किंवा बेजबाबदारपणा इतरांना मोठी किंमत चुकविण्यास कारणीभूत ठरतो. या घटनेमुळे परिसरात काही काळत भीतीचे वातावरण होते. आजूबाजूच्या पर्यटकांमध्येही तणाव जाणवत होता. दरम्यान, पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर हा तणाव हलका होण्यात मदत झाली.