कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आाले आहे. अशातच वसईतील सनसिटी येथे क्रू मेंबर्सकडून कोविड19 च्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. तेथे मास्क घालण्यासह सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे. त्यामुले मनिकपुर पोलीस स्थानकात कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्ययात आला आहे.(COVID-19 Hospital Bed Availability in Mumbai, Thane and Navi Mumbai: मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरातील कोविड 19 रुग्णालयातील बेड्स उपलब्धता पाहण्यासाठी हा डॅशबोर्ड पाहा, जाणून घ्या शहरातील आयसीयू आणि एकूण खांटांबाबत)
वरिष्ठ पोलीस अधिकारी भाऊसाहेब अहिरे यांनी असे म्हटले आहे की, अजय देवगण फिल्म्स कडून 24 मार्चला सेटवर काम करण्यास सुरुवात केली होती. तर गुरुवारी जेव्हा पोलीस राउंडअपसाठी आले असता त्यावेळी सनसटी येथे काही क्रू मेंबर्ससह काही कामगार सेट उभारण्यात व्यस्त होते. त्यापैकी बहुतांश जणांनी मास्क घातलाच नव्हता तर काहींनी हनुवटीच्या खाली मास्क घातल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी शेड्सच्या खाली जेवण दिले जात होते तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन करण्यात आले होते.
त्याचसोबत काही शेड्स खाली बसलेल्या क्रू मेंबर्सने मास्कच घातला नव्हता आणि सोशल डिस्टंन्सिंग सुद्धा त्यांच्यामध्ये नव्हते. पोलिसांनी असे म्हटले की, वसईतील जिल्हाधिकाऱ्यांनी मैदानात शुटिंगसाठी परवानगी दिली होती. परंतु महापालिका आणि पोलीसांकडून परवानगी बद्दल काही तोडगा काढला नव्हता. त्यामुळे क्रू मेंबर्सला सेट खाली उतरवण्यास सांगितला गेला.(Coronavirus Vaccine: 18 वर्षावरील सर्वांना कोरोनावरील लस द्यायला पाहिजे- नाना पटोले)
दरम्यान, वसई-विरार मध्ये सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. गेल्या महिन्यात 2815 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. जे जानेवारी 582 आणि फेब्रुवारी महिन्यात 570 च्या तुलनेत सर्वाधिक होते. त्याचसोबत 15 जणांचा कोरोनामुळे गेल्या महिन्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे शुक्रवार पर्यंत येथील कोरोनाग्रस्तांची संख्या 33,854 वर पोहचली असून त्यात 118 जणांचा बळी गेलेल्यांचा आकडा सुद्धा आहे.