Coronavirus Vaccine: राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कालच्या संवादातून नागरिकांना पुन्हा एकदा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जर परिस्थिती अशीच राहिली तर नाईलाजाने लॉकडाऊन जाहीर करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला राज्यात कोरोनाच्या चाचण्यांचा वेग तुफान वाढला गेला आहे. त्याचसोबत लसीकरणाची मोहिम सुद्धा राज्यातील विविध आरोग्य केंद्रावर सुरु केल्याने नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र सध्या 45 वर्षावरील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जात आहे. अशातच राज्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नाना पटोले यांनी 18 वर्षावरील सर्वांना सुद्धा कोरोनाची लस दिली पाहिजे असे म्हटले आहे.(Pune Mini Lockdown: पुण्यात आजपासून हॉटेल्स बंद, केवळ होम डिलिव्हरी सेवा सुरु)
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता 20 ते 45 वयोगटात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण आणि शहरी विभागातील तरुण वर्गाचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राला लसीकरणासाठीचे वयोगटासाठी काही सूट द्यावी असे पत्र लिहिले पाहिजे असे नाना पटोले यांनी पुढे म्हटले आहे. सर्व जगभरात कोरोनाची लस मोफत दिली जात आहे. परंतु केंद्राचे दुर्भाग्य असे की, ते सर्वांसाठी कोरोनाची लस मोफत उपलब्ध करुन देण्यास असक्षम ठरले आहे. याच कारणामुळे काही नागरिकांना जबरदस्तीने पैसे देऊन कोरोनाची लस घ्यावी लागत आहे.
दरम्यान, कोरोनाची लस घेतल्यानंतर सुद्धा नागरिकांनी मास्क घालणे अनिवार्य असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कोविड19ची लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही असे नाही. पण त्यापासूनची खातरता कमी होण्याची शक्यता आहे. रुग्णवाढ थांबण्यासाठी अद्याप कोणताही उपाय नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन हा घातक पण आपण कात्रीत सापडलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे हिच सुचना वारंवार नागरिकांना दिली जात आहे. (CM Uddhav Thackeray Live Update: पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय पण आज त्याबद्दल जाहीर करत नाही- उद्धव ठाकरे)
तर राज्यात कोरोनाच्या नव्या 47,827 रुग्णांची संख्या वाढली आहे. तर 202 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असून 24126 कोरोनाग्रस्तांनी कोविडवर यशस्वी मात केली आहे. राज्यात सध्या 389832 अॅक्टिव रुग्णसंख्या आहे.