Urmila Matondkar Joins Shiv Sena: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांंचा 'मातोश्री' वर शिवसेना पक्षामध्ये प्रवेश
Urmila Matondkar Joins Shiv Sena| Photo Credits: Twitter/ Shiv Sena

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी आज ( 1 डिसेंबर) शिवसेना (Shiv Sena) पक्षामध्ये प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व येथील ठाकरे कुटुंबीयांच्या 'मातोश्री' (Matoshree) निवासस्थानी त्यांच्या हातामध्ये शिवबंधन बांधण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त 12 जणांच्या यादीमध्येही शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली नाही. मात्र आज अधिकृतपणे उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणूक 2019 च्या रणधुमाळीमध्ये उर्मिला यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांचा भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला. त्यावेळेस स्थानिक कॉंग्रेस नेते आणि अंतर्गत गटबाजीमुळे आपला पराभव झाल्याचं सांगत त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला होता. त्यानंतर सातत्याने त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. अअता अखेर उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. Pritam Munde On Urmila Matondkar: ऊर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया.

पक्ष प्रवेशाच्या वेळेस शिवसेना पक्षाप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह शिवसेनेचे काही नेते पदाधिकारी उपस्थित होते. आता उर्मिला मातोंडकर संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.