उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळ (UPSRTC) बसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तो व्हायरल होण्याची कारणे तुम्हाला समजू शकतील. हा व्हिडिओ अनेकांना थक्क करतो तसेच, देसी जुगाड (Desi Jugad) कुठे आणि कसे वापरता येईल हे सुद्धा दाखवतो.पण, अपघाताचा धोका असूनही अशा प्रकारे नको ते प्रयोग, उद्योग का केले जात असतात असा सवालही हा व्हिडिओ (Desi Jugad Viral Video) पाहिल्यावर उत्पन्न होतात.
विपिन राठौर नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या बसमध्ये 'जुगाड' सह वायपर चालू आहे, असे त्याने व्हिडिओ शेअर करताना पोस्टमध्ये लिहिले आहे. व्हिडिओमध्ये, एक UPSRTC बस चालक सदोष विंडशील्ड वायपर हलवण्यासाठी दोरी ओढताना दिसतो. तात्पुरत्या वायपरमध्ये पाण्याची बाटली असल्याचे देखील पाहायला मिळते. (हेही वाचा, Desi Jugaad: 'साबणाचे फुगे' उडाले जेव्हा देसी जुगाड जमले, पाहा व्हायरल व्हिडोओ)
ट्विट
उत्तर प्रदेश परिवहन निगम की बस में जुगाड़ से चलता वाइपर 👇@UPSRTCHQ @UPSRTC_Meerut pic.twitter.com/IOofdiNbRE
— Vipin Rathaur (@VipinRathaur) October 9, 2022
दरम्यान, बसचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, UPSRTC मेरठने त्याची दखल घेतली आणि उत्तर दिले, "सर, वाइपर 08 ऑक्टोबर 2022 रोजीच ठिक करण्यात आला होता. तसेच, वायपर ठिक केल्याचा फोटोही प्रशासनाने समाजमाध्यमांवर अपलोड केला आहे.
ट्विट
@myogiadityanath @kpmaurya1 dekh lijiye sir ye hai up ka haal
— Rajesh Gupta (@RajeshG73735357) October 9, 2022
तीन दिवसांपूर्वी ट्विटरवर शेअर केल्यापासून, हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. त्याला मोठ्या संख्येने लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहींना व्हिडिओमध्ये दाखवलेला 'जुगाड' गमतीशीर वाटला, तर काहींनी वाहनाच्या दुरुस्ती आणि देखभालीवर तसेच सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
उत्तर प्रदेश बस चालकाचा हा अभिनव प्रयोग पाहून एका व्यक्तीने प्रतिक्रियेत पोस्ट म्हटले अभिनव कल्पना. दुसऱ्याने विचारले त्यांना मोटार वाहन कायदा लागू होत नाही का? तर तिसऱ्या एका युजर्सने म्हटले की, रोडवेजच्या बसेसची स्थिती आजही खराब आहे. त्यांची दुरुस्ती आणि देखभाल केली जात नाही.