Mumbai Rains (PC - Twitter)

Mumbai Rains: रविवारी पहाटे मुंबईत अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. याआधी, मुंबई आणि आसपासच्या भागात आठवड्याच्या शेवटी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान संस्थेने वर्तवली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पिवळा अलर्ट जारी केला होता.

काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह अचानक झालेल्या पावसाचे व्हिडिओ लोकांना X (पूर्वीचे Twitter) वर शेअर केले. मुंबईत रविवारी सकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला. (हेही वाचा - Mahaparinirvan Din 2023 Special Trains: महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य रेल्वे चालवणार 14 अनारक्षित विशेष फेर्‍या; इथे पहा ट्रेनचं वेळापत्रक!)

अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील वायू प्रदूषणापासून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या नोव्हेंबरमध्ये शहरात पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी नोव्हेंबरमध्येही पाऊस पडला होता, ज्यामुळे हवेची खराब होत असलेली गुणवत्ता नियंत्रणात आणण्यास मदत झाली होती.

दरम्यान, आज झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना प्रदुषणापासून निश्चितच सुटकेचा श्वास घेण्यास मदत होईल. याचा शहरातील हवेच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होईल.