देशाच्या आर्थिक राजधानीवर कब्जा मिळवण्याचा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचा डाव होता: रविशंकर प्रसाद
Union Minister Ravi Shankar Prasad | (Photo Credits-ANI)

विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra assembly Elections 2019) चा लागलेला निकाल हा भाजपचा नैतिक आणि राजकीय विजय होता. जनतेने दिलेला कौल स्पष्ट होता. असे असताना शिवसेना (Shiv Sena) कोणाच्या जीवावर इतकी उचल खात होती? असा सवाल विचारत शिवसेनेने सत्तेसाठी मॅच फिक्सिंग केली होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ( Congress) यांचे सरकार स्थापन करत देशाच्या आर्थिक राजधानीवर मागल्या दाराने कब्जा करण्याचा डाव होता, असा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad यांनी केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे भाजपने आगोदरच स्पष्ट केले होते. युतीद्वारे लढले असताना शिवसेना कार्यकर्त्यांनीही दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसाठी चांगले काम केले, असेही प्रसाद म्हणाले.

नवे सरकार महाराष्ट्राला स्थिर शासन देईल असे सांगतानाच रविशंकर प्रसाद म्हणाले की, आज सकाळपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी अथवा काँग्रेस या पैकी कोणत्याही पक्षाने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला नाही. शरद पवार हे शेवटपर्यंत सांगत होते की, आम्हाला जनतेने विरोधात बसण्यासाठी आदेश दिला आहे. असे होते तर, मग शेवटच्या क्षणी शब्द कसा फिरला. जनादेशाचे पालन न करणेह हा जनतेचा आपमान आहे. त्यामुळे खिचडी सरकार सत्तेत येण्यापेक्षा स्थिर सरकार सत्तेवर येणे हा भाजपचे ध्येय, असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार असल्याने शिवसेनेचे आमदार निवडून येण्यात मोठी मदत झाली: रविशंकर प्रसाद

रविशंकर प्रसाद

दरम्यान, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा काँग्रेस विरोध सर्वश्रुत आहे. त्यामुळे जे लोक बाळासाहेब ठाकरे यांचा विचार मानू शकले नाहीत, अशांबद्दल बोलायचे नाही, असा टोलाही प्रसाद यांनी शिवसेनेला लगावला. तसेच, शिवसेना पक्षाने केवळ स्वार्थासाठी युती तोडली. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेणे बंद करावे.