Underworld don Dawood Ibrahim पाकिस्तानच्या कराची मध्ये; भाचा Alishah Parkar ची ईडीला माहिती
File image of Dawood Ibrahim | (Photo Credits: PTI)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) चा भाचा Alishah Parkar ने भारताचा मोस्ट वॉन्टेट डोन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानच्या कराची(Karachi) मध्ये असल्याचा दावा केला आहे. दरम्यान त्याचा थेट संपर्क नसला तरीही पत्नी आणि बहिणीशी दाऊदची पत्नी सणानिमित्त, कार्यक्रमांनिमित्त संपर्क करत असल्याचं म्हटलं आहे. Alishah Parkar ने ईडीला दिलेल्या स्टेटमेंट मध्ये 1986 साली त्याच्या जन्मापूर्वीच दाऊदने भारत सोडला आहे. आणि दाऊद त्यांतर कराची मध्ये आहे. अलिशाह पारकर हा दाऊद ची बहिण हसिना पारकर चा मुलगा आहे.

अलिशाह चा थेट दाऊद सोबत संपर्क नसला तरीही घरातील व्यक्तींच्या माहितीनुसार तो कराची मध्ये आहे. अलिशाह किंवा त्याच्या कुटुंबियांचा त्याच्याशी संपर्क नसतो पण ईद, दिवाळी आणि अन्य सणांच्या निमित्ताने Mehjabeen Dawood म्हणजेच दाऊद इब्राहीमची पत्नी आपली पत्नी आयशा आणि बहिणीसोबत संपर्क साधत असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Money Laundering Case: नेते Nawab Malik यांनी दाऊदची बहीण हसीनाला 55 लाख रोख दिले; ED च्या चार्जशीटमध्ये खुलासा.

ईडी कडून अलिशाह पारकरची अनेकदा चौकशी करण्यात आली होती. मुंबईतील एका राजकारण्यासंबंधी मनी लॉडरिंग प्रकरणात चौकशी करताना अलिशाह ची फेब्रुवारी महिन्यात चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दाऊदच्या लोकेशन बाबत माहिती मिळाल्याने त्यावर केंद्र सरकारने पावलं उचलावीत.