![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/death-784x441-380x214.jpg)
किरकोर वादातून आपल्या काकाची हत्या केल्याप्रकरणी पुतण्याला अटक केली आहे. ही घटना नागपूरच्या (Nagpur) पाचपावली पोलीस स्टेशन (Pachpavli Police Station) हद्दीतील पंचशील नगर येथे गुरुवारी रात्री घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे आणि आरोपीच्या वडिलांचे गेल्या काही वर्षांपूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपीने आपल्याच काकाची हत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अशोक मेश्राम असे हत्या झालेल्या काकाचे नाव आहे. तर, सारंग युवराज मेश्राम असे आरोपीचे नाव आहे. मेश्राम दारूचे व्यसन असून तो एका चिकनच्या दुकानात कामाला होता. मेश्रामच्या घराचे काम सुरु होते. त्यावरून मेश्रामने त्याचा पुतण्या सारंगसोबत वाद झाला. त्यावेळी मेश्रामने सारंगला शिवीगाळ केली. याच रागातून सारंगने मेश्राम झोपलेला असताना त्याच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार केला. ज्यामुळे मेश्रामचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा-मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 जणांना अटक करत 8 मॉडेल्सची पोलिसांनी केली सुटका
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हत्येचे सत्र सुरुच आहे. यात वरील घटनेने आणखी भर घातली आहे.