Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Utkarsh Hingane Suicide Case: पुण्यातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे बीड येथील एका 18 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्याने, वानवडी परिसरातील त्याच्या राहत्या घरी गळा चिरून आत्महत्या (Suicide) केली. उत्कर्ष महादेव हिंगणे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो एम्स भोपाळमध्ये शिक्षण घेत होता. उत्कर्ष एका उत्सवासाठी पुण्यात एएफएमसीमध्ये आला होता. गेल्या एक वर्षापासून तो नैराश्यात होता आणि त्यावर उपचारही घेत होता.

उत्कर्षने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर एक संदेश पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने शैक्षणिक ताणतणावामुळे आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली असून पुढील तपास सुरू केला आहे. (हेही वाचा, JEE Fail Student Dies By Suicide: 'आई-बाबा, मला माफ करा' जेईई परीक्षेत अपयश, इयत्ता आकरावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या)

सोमवारी सकाळी 9:15 च्या सुमारास पोलिसांना फोन आला. त्यानंतर पोलिस वानवडी येथील पंचरत्न हाऊसिंग सोसायटीमध्ये पोहोचले, जिथे त्यांना उत्कर्षचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला. त्याच्या मानेवर गंभीर जखम होती. (हेही वाचा, JEE Aspirant: कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच; बिहारमधील 16 वर्षीय विद्यार्थ्याची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या)

सुरुवातीच्या तपासादरम्यान, पोलिसांना उत्कर्षचा मोबाईल फोन सापडला, ज्यामध्ये व्हॉट्सअॅप संदेश होता. त्याने आपल्या व्हॉट्सअॅप संदेशात त्याच्या आत्महत्येमागील शैक्षणिक दबावाचा उल्लेख होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस ठाण्याने पुष्टी केली की, मूळचा बीड जिल्ह्यातील उत्कर्षला अलीकडेच वैद्यकीय शिक्षणासाठी एम्स भोपाळमध्ये प्रवेश मिळाला होता. ही घटना घडली तेव्हा तो एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुण्यात होता.