Mumbai Railway Mega Block on 5th January: मध्य, हार्बर मार्गावर आज मध्यरात्रीपासून सुरु होणार मेगाब्लॉक, जाणून घ्या सविस्तर
Megablock Cancelled | Representational Image | (Photo Credits-Facebook)

विद्याविहार ते मुलुंड (Vidyavihar to Mulund) पादचारी पुलाच्या कामासाठी रविवारी म्हणजेच 5 जानेवारीला मध्य मार्गावर मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. येत्या रविवारच्या मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची मात्र सुटका झाली आहे. विद्याविहार ते कुर्ला दरम्यान शनिवारी रात्री 12 ते रविवारी पहाटे 5 च्या दरम्यान अप जाणाऱ्या रेल्वे जलद असणार असून डाऊन जाणाऱ्या रेल्वे धीम्या असणार आहेत. विक्रोळी स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर उभारण्याकरिता आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून रविवारी सकाळी 5 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.

चाकरमान्यांची शनिवारी रात्रीपासून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी होणाऱ्या मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे थोडी गैरसोय होणार आहे. आज रात्रीच्या सुमारास विक्रोळी स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर उभारण्याकरता रात्री 12 ते पहाटे 5 वाजे पर्यंत ट्राफीक ब्लॉक घेण्यात येईल. तर 6 आणि 7 जानेवारीला पश्चिम रेल्वेवर वांद्रे यार्डामध्ये जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांनी वेळेचं नियोजन करूनच घराबाहेर पडणं सोईचं ठरणार आहे.

हेदेखील वाचा- Mumbai: नेरुळ-सिबीडी रेल्वे स्थानकादरम्यान 2 ट्रेन आमने-सामने; मोठा अनर्थ थोडक्यात टळला, लोकलसेवा विस्कळीत

कुठे आणि कधी असेल मेगाब्लॉक?

मध्य रेल्वे - मुलूंड ते माटुंगा दरम्यान 11.30 ते दुपारी 4 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. अप जलद मार्गावर हा मेगाब्लॉक होणार आहे.

हार्बर रेल्वे - सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान 11.40 ते 4.10 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

विक्रोळी पूल काम - विद्याविहार ते कुर्ला दरम्यान शनिवारी रात्री 12 ते रविवारी पहाटे 5 च्या दरम्यान अप जाणाऱ्या रेल्वे जलद असणार असून डाऊन जाणाऱ्या रेल्वे धीम्या असणार आहेत.

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी, 5 जानेवारी रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर 6, 7 जानेवारीला वांद्रे यार्डमध्ये जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. तर विक्रोळी स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर उभारण्याकरता शनिवारी रात्री ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.