Manohar Joshi Passes Away: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. पण त्यांनी कधीही शिवसेना सोडली नाही. ते आयुष्यभर शिवसेना पक्षाशीच एकनिष्ठ राहिले. त्यांचे जाणे (Manohar Joshi Passes Away) हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली तेव्हा त्यांच्यासोबत अटक झालेल्यापैकी ते एक होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाचे (Shiv Sena (UBT) मोठे नुकसान झाल्याची भावना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. मनोहर जोशी यांच्या निधनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर अनुयायी
मनोहर जोशी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे अनुययी अशी त्यांची ओळख होती. मनोहर जोशी यांनी मुंबई (Mumbai) येथील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. अलिकडेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तसेच, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार, सकाळी 11 ते 2 या दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (हेही वाचा, Manohar Joshi Passes Away: जोशी सर गेले! उद्धव ठाकरे यांनी अर्धवट सोडला बुलढाणा दौरा; शिवसेना (UBT) नेत्यांकडूनही दु:ख व्यक्त)
उद्धव ठाकरे यांनी अर्धवट सोडला बुलढाणा दौरा
लोकसभा निवडणूक 2024 च्या मोर्चेबांधणीसाठी उद्धव ठाकरे हे बुलढाणा दोऱ्यावर होते. बुलढाणा जिल्ह्यात आज त्यांच्या तीन जाहीर सभा होणार होत्या. दरम्यन, मनोहर जोशी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच उद्धव ठाकरे आज (23 फेब्रुवारी) दिवसभरातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच, बुलढाणा दौरा अर्धवट सोडून ( ते मुंबईला रवाना होणार आहेत. (हेही वाचा, Manohar Joshi Passed Away: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच निधन, हिंदूजा रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास)
एक्स पोस्ट
Maharashtra: On former CM Manohar Joshi's demise, Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray says, "It is very unfortunate. Manohar Joshi had seen many ups and downs in his life but he never left Shiv Sena, he always stayed loyal to the party... When Balasaheb Thackeray was arrested,… pic.twitter.com/pbeQJgYNrp
— ANI (@ANI) February 23, 2024
शिवसैनिक ते मुख्यमंत्री
मनोहर जोशी यांना जोशी सर म्हणून ओळखले जात असे. सुरुवातीच्या कालात अध्यापण व्यवसायात असलेले मनोहर जोशी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या झंजावताकडे आकर्शित झाले. त्यातून सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री असा प्रवास त्यांनी केला. आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक पदे भूषवली. ज्यामध्ये लोकसभा अध्यक्ष पदाचाही समावेश आहे. समजसूचक आणि धोरमात्मक निर्मण घेणे ही त्यांच्या कार्याची ओळख होते. प्रभावी भाषणकला आणि वाकचातूर्य लाभलेल्या जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विशेष विश्वास संपादन केला होता. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री चालणार का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा वरदहस्त लाभल्याने त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.