Uddhav Thackeray | (Photo Credit: ANI)

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये 28 वर्षांनंतर भाजपाला पराभव स्वीकारावा लागला आहे. कसब्यात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीमध्ये आज कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी झाले आहेत. अजित पवारांनी हा विजय मविआ च्या एकजुटीचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपावर टीकास्त्र डागत 'कसबा पेठची जनता एवढ्या वर्षांच्या भ्रमातून बाहेर पडू शकते तर देशातील जनता देखील बाहेर पडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान चिंचवडमध्येही नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्या मतांची बेरीज केली तर भाजपा विरोधी मतं वाढत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

चिंचवड मध्ये दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप विजयाच्या उंबरठ्यावर असल्या तरीही त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि राहुल कलाटे यांची मतं अधिक आहे.  Pune Bypoll Election 2023: कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूकींचा निकाल हा 'थोडी खुशी थोडा गम' म्हणत अजित पवारांकडून रविंद्र धनगेकर यांचं कौतुक तर राहुल कलाटेंची कानउघडणी .

भाजपाची वापरा आणि फेका नीती त्यांच्या कसब्याच्या निकालाला कारणीभूत असेल अशी प्रतिक्रियाही त्यांनी बोलून दाखवली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला डावलण्यात आलं असल्याची भावना समोर आली होती. तसेच गिरीश बापटांनाही आजारपणात  सभेत बोलावणं यातून त्यांची वापरा आणि फेका नीती दिसते. हीच त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्ताच्या नेमणूकीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचंही कौतुक त्यांनी केलं आहे.