Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

पुण्यामध्ये आज कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchawad) पोटनिवडणूकीची मतमोजणी झाली. भाजपाच्या दिवंगत आमदारांच्या जागेवर झालेल्या निवडणूकीमध्ये कसबा पेठ मधून मविआ चे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी ठरले आहेत तर चिंचवड मध्ये अश्विनी जगताप विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. पुण्याच्या पोटनिवडणूकींचा निकाल हा 'थोडी खुशी थोडा गम' असा आहे म्हणत त्यांनी कॉंग्रेसच्या विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे तर चिंचवडची जागा राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे गमावतअसल्याचं दु:ख देखील बोलून दाखवलं आहे.

कसबा पेठ मध्ये 28 वर्षांनंतर भाजपाला पराभव पहावा लागत आहे. या विधानसभा जागेवरून गिरीष बापट आणि त्यानंतर मुक्ता टिळक सातत्याने जिंकत आल्या होत्या. हर एक मार्गाने मतदारांना फितवण्याचे प्रकार कसबा मध्ये झाले पण मतदारांनी रविंद्र धंगेकरच्या बाजूने कौल दिला आहे. काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह शिंदेगटाला ज्या पद्धतीने मिळालं त्याचा बदला घेण्यासाठी मविआला मतदान करा असं आवाहन केले होते. त्यामुळे हा विजय मविआ चा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: Kasba Assembly Election Result 2023: बालेकिल्ल्यात भाजप चारीमुंड्या चीत; रविंद्र धंगेकर विजयी, भाजपचे हेमंत रासने पराभूत, CM एकनाथ शिंदे, डीसीएम देवेंद्र फडणवीस यांना धक्का .

'शिंदे-फडणवीस सरकार लोकांना अमान्य'

शिंदे फडणवीस सरकार लोकांना अमान्य असल्याचं अजित पवार यांनी आज पुन्हा म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री असताना रॅलीत फिरण्यावरून त्यांनी दिलेल्या उत्तराचा दाखला देत अजित पवारांनी कोपरखळी देखील मारली आहे. 'सामान्य जनतेचा मुख्यमंत्री असलेल्यांना या जनतेनेच मतदानाद्वारा काय ते दाखवलं' असल्याचं ते म्हणाले आहे.

चिंचवडच्या जागेवर देखील नाना काटे आणि राहुल कलाटे यांची एकत्र मतं देखील आता विजयी जाहीर होणार्‍या उमेदवारापेक्षा जास्त आहेत त्यामुळे ही बंडखोरी झाली नसती तर चिंचवडची जागा देखील महाविकास आघाडीची असती असं म्हणत कलाटेंची कानउघडणी केली आहे.

लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या प्रमाणेच गिरीष बापटांना ज्या अवस्थेमध्ये सभेला आणलं, मतदानाला आणलं ते माणूसकीला धरून होतं का? असा सवाल विचारत त्यांनी भाजपावर टीकास्त्र डागलं आहे.