Sanjay Raut on Narayan Rane: नारायण राणे यांना संजय राऊत यांच्याकडून कायदेशीर नोटीस
Sanjay Raut,Narayan Rane | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवली आहे. नारायण राणे (Sanjay Raut on Narayan Rane) हे पाठिमागील अनेक दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि संजय राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधत आहेत. राणे यांनी संजय राऊत यांच्यावर वेळोवेळी अनेक आरोपीही केले आहेत. या आरोपांवरुनच राऊत यांनी राणे यांना थेट आव्हान देत कोर्टात खेचले आहे.

कर नाही तर डर कशाला?

संजय राऊत यांनी नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस बजावल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. राऊत यांनी आपल्या ट्विमध्ये म्हटले आहे की, नारायण राणे सार्वजनिक मंचावरून तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेने बाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात.हे आरोप त्यांनी सिध्द करावेत. अन्यथा माफी मागावी.माझे वकील सार्थक शेट्टी यांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस बजावली आहे. याच ट्विटमध्ये राऊत यांनी कर नाही तर डर कशाला? असा सवालही केला आहे. (हेही वाचा, Anil Parab and MHADA Conflict: अनिल परब यांचे कार्यलय तोडले; शिवसैनिक म्हाडा कार्यालयात घुसले)

नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष जुना आहे. नारायण राणे हे एकेकाळचे कट्टर शिवसैक. बाळासाहेब ठाकरे यांच्या वरदहस्ताने ते मुख्यमंत्री पदापर्यंतही पोहोचले. पण, पुढे काही कारणावरुन त्यांचे बाळासाहेब ठकरे यांच्या हायातीतच शिवसेनेशी बिनसले. त्यातून त्यांनी शिवसेना सोडली. त्यांनी थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून शिवसेना आणि राणे यांच्यातून विस्तवही जात नाही. आता ते भाजपमध्ये आहेत. भाजपमध्ये असलेल्या राणे पितापुत्रांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्विट

संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समजले जातात. शिवसेनेची तोफ म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. दरम्यान, त्यांच्यावर झालेल्या पत्राचाळ प्रकरणात त्यांना अटही झाली. ते तुरुंगातही जाऊन आले. परंतू, अनेक दबाव येऊनही त्यांनी शिवसेनाप पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही.