Anil Parab and MHADA Conflict: अनिल परब यांचे कार्यलय तोडले; शिवसैनिक म्हाडा कार्यालयात घुसले
Anil Parab | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Anil Parab's Office Demolished: मुंबईतील बांद्रा येथे म्हाडा वसाहतींमध्ये असलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena) आमदार अनिल परब (Anil Parab) यांचे कार्यालय पाडण्यावरुन राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. कार्यालय पाडल्यानंतर अनिल परब यांनी एक पत्रकार परिषदही घेतली. दरम्यान, कार्यालय पाडल्याने संतप्त झालेले शिवसैनिक थेट म्हाडा कार्यालयात (Shivsainik In MHADA BKC) घुसले आहेत. आमदार अनिल परबही जाब विचारण्यासाठी म्हाडा (MHADA Office) कार्यालायत दाखल झाले आहेत. कार्यालय का पाडलं? म्हाडा अशी काम का करत आहेत? म्हाडावर कोणाचा दबाव आहे काय? असा सवाल उपस्थित या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी अनिल परब म्हाडा कार्यालयात दाखल झाले आहेत.

म्हाडा कार्यालयात मोठ्या प्रमाणावर जमलेल्या शिवसैनिकांना आमदार अनिल परब यांनी शांततेचे अवाहन केले. मी आमदार आहे. त्यामुळे माझी गाडी म्हाडा कार्यालयाच्या आवारात जाणार आहेत. माझ्यासोबत महत्त्वाचे काही 10 ते 15 लोक येतील. बाकिच्यांनी मी कार्यालयातून बाहेर येत नाही तोपर्यंत इथेच थांबा. आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय इथून हटायचे नाही, असा सल्लाच आमदार परब यांनी जमलेल्या शिवसैनिकांना दिला. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करु नये. बळाचा वापर केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला आपण जबाबदार असणार नाही. त्यासाठी पोलीसच सर्वस्वी जबाबदार असतील, असेही परब या वेळी म्हणाले. (हेही वाचा, ED's Action Against Anil Parab: शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त)

दरम्यान, अनिल परब यांचे कार्यालय पाडल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या तिथे जाणार होते. मात्र, तत्पूर्वी अनिल परब आणि स्थानिक शिवसैनिकांनी सोमय्या यांनी इथे येऊनच दाखवावे. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. आज ते पाहूणचार घेऊनच घरी जातील, असा सज्जड इशाराच दिला. त्यानंतर पाहणी करण्यास निघालेल्या किरीट सोमय्या यांची गाडी मुंबई पोलिसांनी बीकेसी येथेच अडवली. त्यानंतर सोमय्या यांनी म्हाडाचे अधिकारी आणि पोलिसांशी चर्चा केली. त्यानंतर कार्यालय पडले आहे. त्यामुळे तिथे जाऊन पाहणी करण्याची आता आवश्यकता नाही, असे सांगत कार्यालय पाडलेल्या ठिकाणी जाण्यापासून स्वत:ला दूर ठेवले.