CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स (Learning Driving Licences) मिळविण्यासाठी आरटीओत जाऊन परीक्षा द्यावी लागत होती. मात्र, आता लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे आरटीओमधील तफावत कमी होईल. याशिवाय, प्रशासनावरील ओझे कमी होईल आणि नागरिक व सरकार या दोघांसाठीही वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. परिवहन विभागाकडून नवीन संकल्पना आजपासून अंमलात आणली जात आहे. या सेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. परंतु, या उपक्रमात सहभागी होण्याआधी उद्धव ठाकरे यांनी स्वत:चे ड्राईव्हिंग लायसन्स का तपासले? या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, "बर्‍याच वेळा असे घडते की आम्ही नियम बनवितो, कायदा करतो आणि अंमलबजावणी करण्यात कमी पडतो, परंतु कोविडने आम्हाला त्यांचे अनुसरण करण्यास उद्युक्त केले. काही गोष्टी चांगल्या आहेत, काही वाईट आहेत कारण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. मला जेव्हा या उपक्रमाबद्दल सांगितले गेले, तेव्हा मी प्रथम माझ्या ड्राईव्हिंग लायसन्सची एक्पायरी डेट तपासली. कारण, मी स्वत: गाडी चालवतो. जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स लहान पुस्तिका होती आणि त्यासाठी काळजी घ्यावी लागत असे. मात्र, आता स्मार्टकार्ड दिले जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Maratha Reservation: उदयनराजे भोसले यांना भेटल्यानंर मराठा आरक्षण मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांचे महत्त्वपूर्ण विधान

ट्वीट-

लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांना परिवहनच्या संके तस्थळावर जाऊन अर्ज करताना बरीच माहिती भरावी लागते. ऑनलाईन अर्ज के ल्यानंतर आरटीओकडून उपलब्ध सत्रानुसार वेळ दिली जाते. कधीकधी या परीक्षेची तारीख लवकरच मिळते, नाहीतर किमान एक महिना तरी प्रतिक्षा करावी लागते. मात्र, आता घरबसल्या परीक्षा देता येणार आहे. याशिवाय अर्जदाराला आरटीओत जाऊनही परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध असणारच आहे. आरटीओत जाऊन परीक्षा दिल्यास ती 15 प्रश्नांचीच असणार आहे. घर बसल्या परीक्षा दिल्यास प्रश्नांमध्ये वाढ होईल.