Uddhav Thackeray And Manohar Joshi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे अनुययी मनोहर जोशी यांचे निधन (Manohar Joshi Passes Away) झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे शिवसेना (UBT) आणि त्यांना मानणाऱ्या शिवसैनिकांमध्ये एकच शोककळा पसरली. दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या निधनाचे वृत्त कळताच त्यांनी आले आज (23 फेब्रुवारी) दिवसभरातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच, बुलढाणा दौरा अर्धवट सोडून (Uddhav Thackeray Buldhana's Tour Cancel ) ते मुंबईला रवाना होणार आहेत. लोकसभा निवडणूक 2024 च्या मोर्चेबांधणीसाठी ते बुलढाणा दौऱ्यावर आले होते. दरम्यान, 'जोशी सर गेले' अशी भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत असून, अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मनोहर जोशी यांनी मुंबई (Mumbai) येथील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. अलिकडेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तसेच, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार, सकाळी 11 ते 2 या दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या तीन सभा रद्द!

लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी बुलढाणा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या आज तीन सभा पूर्वनियोजित होत्या. मात्र, मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर उद्धव ठाकरे हे शेगाव येथून थेट मुंबईला परतणार आहेत. शेगाव येथून ते संभाजीनगर विमानतळ येथून जोशी सरांच्या पार्थीवाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईला रवाना होतील अशी माहिती आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. (हेही वाचा, Manohar Joshi Passed Away: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच निधन, हिंदूजा रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास)

अखेरच्या श्वासापर्यंत शवसैनिक म्हणून जगले- संजय राऊत

मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल एक्स हँडलवर भाना व्यक्त करताना शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ''शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी. अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!''  (हेही वाचा, Manohar Joshi's Wife Passes Away: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन)

एक्स पोस्ट

मनोहर जोशी सर यांच्या निधनाने दु:ख: मिलिंद नार्वेकर

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी मनोहर जोशी सर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

एक्स पोस्ट

मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. त्यासोबतच ते लोकसभा अध्यक्षही राहिले आहेत. सुरुवातीच्या काळात एक प्राध्यापक ते साधा शिवसैनिक आणि पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये अनेक चढउतार पाहिले. त्यांच्या निधनाने एक सच्चा शिवसैनिक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.