उदयनराजे भोसले यांना खंडणी आणि मारहाण प्रकरणी मोठा दिलासा; सातारा सत्र न्यायालयाकडून 12 जण निर्दोष
Udayanraje Bhosale | (Photo credit : Facebook)

सातार्‍याचे छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लोणंद येथील सोना अलायंस कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल करण्यात खटल्यात त्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणामध्ये सातारा (Satara) सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. दरम्यान या सार्‍यांवर जैन यांना मारहाब आणी 24 लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप होता, दरम्यान राजकुमार जैन (Rajkumar Jain)  यांनी 23 मार्च 2017 दिवशी उदयनराजेंच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 'छत्रपतींच्या वंशजांबद्दल काहीही वेडेवाकडे बोलले तर, जीभ कापून टाकू' नारायण राणे यांचा संजय राऊत यांना इशारा

 

सोना अलायंस ही कंपनी विटा बनवण्याचं काम करते. या कंपनीमध्ये उदयनराजेंच्या नेतृत्त्वाखाली कामगारांची संघटना आहे. दरम्यान त्यांनी या कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना खंडणीची मागणी केली, त्याला मारहाण केली असा आरोप आहे. तर या प्रकरणामध्ये पोलिस तक्रार देखील करण्यात आली आहे. उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान 2017 साली उदयनराजे यांच्यासह 9 जणांना अटकही करण्यात आली होती.

उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणामध्ये अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. तेव्हा बॉम्बे हायकोर्टानेदेखील उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र आता सातारा सत्र न्यायालयाकडून उदयनराजेंना मोठा दिलासा मिळाला आहे.