Yerawada Central Prison (PC - Twitter)

Prisoners Escaped from Yerawada Central Prison: पुण्यात येरवडा मध्यवर्ती कारागृहात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून 2 कोरोना पॉझिटिव्ह कैदी फरार झाले आहेत. आज पहाटे 1 च्या सुमारास या कैद्यांनी कारागृहातून पळ काढला. या कैद्यांचा पोलीस शोध घेत आहेत. यासंदर्भात येरवडा कारागृहाच्या जेल अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीसुद्धा काही कैद्यांनी कारागृहातून धूम ठोकली आहे. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात येरवडा मध्यवर्ती कारागृहातील पाच कैदी फरार झाले होते. (हेही वाचा - Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र 10 लाख कोरोना रुग्णसंख्या गाठण्याच्या मार्गावर, पहा कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित)

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कारागृहातील कैद्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी येरवडा कारागृहाने विशेष काळजी घेतली आहे. कैद्यांची आरोग्य तपासणी, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील स्क्रीनिंग अनिवार्य करण्यात आलं आहे.

सध्या राज्यभरातील कारागृहांमध्ये सुरू असणारे विविध वस्तूंच्या उत्पादनाचे काम थांबण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आरोपींना भेटीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.