![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/08/unnamed-2021-08-07T215007.429-380x214.jpg)
जपानमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक महाकुंभमध्ये (Tokyo Olympics 2020) भारतीय खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत नीरजने सुवर्ण पदक जिंकूण देशासाठी मोठी कामगिरी केली आहे. या पराक्रमासह, नीरज चोप्रा वैयक्तिक ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा इतिहासातील दुसरा आणि अॅथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. नीरजच्या कामगिरीवर सर्वच स्तरावरून कौतूकाचा वर्षाव होत आहे. यातच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर कविता शेअर करीत नीरजचे अभिनंदन केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी नीरजचे मनापासून कौतूक केले आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये इतर 7 पदके जिंकलेल्या भारतीय खेळाडूचेही त्यांनी अभिनंदन केले आहे. याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही. मात्र, आपल्या खेळाच्या जोरावर संपूर्ण जगावर छाप सोडलेल्या खेळाडूंनाही त्यांनी मानसिक बळ दिले आहे. हे देखील वाचा- Tokyo Olympics 2020: नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी! उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्याकडून कौतूकाचा वर्षाव
देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-
ये भाला तो वीर शिवा का और रणभेदी राणा का है,
भारत माँ का सपूत नीरज बेटा तो हरियाणा का है।
आज तिरंगा ऊँचा चढ़ते देख सीना चौड़ा है,
और राष्ट्रगान की धुन पर अपना लहू रगों में दौड़ा है !#IndiaAtOlympics #Tokyo2020 #TokyoOlympics #NeerajChopra #goldmedal #Gold #Cheer4India #History pic.twitter.com/SAOUOP393v
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 7, 2021
‘आर्मी मॅन’ नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताला आनंद साजरा करण्याची संधी दिली. त्याने आपले सुवर्णपदक ‘फ्लाइंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केले आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आणि वैयक्तिक स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक आहे. नीरजच्या आधी अनुभवी नेमबाज अभिनव बिंद्राने 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.