राज्यतील बैलगाडी शर्यतीसंबंधी आज अंतीम सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठा समोर आज ही सुनावणी पार पडणार आहे. डिसेंबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्यात आली होती पण आज या प्रकरणी अंतीम सुनावणी होणार आहे. तरी आज फक्त महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतच नाही तर तामिळनाडूसह कर्नाटकातील जलकट्टूबाबत ही एकत्रीत सुनावणी पार पडणार आहे. तरी या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालय अंतीम निर्णय काय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार २०११ पासून राज्यात बैलगाडा शर्यतीस बंदी घातली होती तरी याबाबत अधिकृत पत्रक काढत एप्रिल २०१२ पासून महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. पण राज्यातील ग्रामीण भागातून ही शर्यत पुन्हा सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आणि अखेर २०१९ मध्ये या मागणीस हिरवा कंदील मिळाला.

 

महाराष्ट्र (Maharashtra) आणि तामिळनाडू (Tamil Nadu) या दोन्ही राज्यांच्या बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) संबंधीत कायद्याना आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आल्या आहेत. याचं याचिकेवर आज अंतीम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीपल फॉर द ऐथिकल ट्रिटमेंट ऑफ अनिमल्सच्या (People For the Ethical Treatment Of Animals) नेतृत्वाखाली कर्नाटक (Karnataka)-तामिळनाडूतील जलकट्टू (Jallikattu) आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. (हे ही वाचा:- Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेसंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार, दुसऱ्या खंडपिठापुढे जाण्याचे याचिकाकर्त्याला निर्देश)

 

जानेवारीत तामिळनाडू (Tamil Nadu) आणि कर्नाटकात (Karnataka) जलकट्टूचा (Jallikattu) उत्सव साजरा करण्यात येतो. तरी त्यापूर्वी तातडीने सुनावणीची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. म्हणून आज म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस होणारी ही सुनावणी अधिक महत्वपूर्ण आहे. तरी आज जलकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीबाबत अंतीम फैसला होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.