बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे राजकारण करून महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच षडयंत्र रचले जातेय- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला होता. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नेमका का केली? त्याला नेमके कोणत्या गोष्टीची चिंता होती? त्याला नैराश्य आले होते का? अशा प्रशांची उत्तरे शोधली जात आहेत. मात्र, सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, अशी मागणी अनेक राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. यावर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आक्षेप घेतला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवणे म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) कर्तृत्वावर निर्माण करण्यासारखे आहे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

सुशांत सिंग राजपूत च्या मृत्यूचे राजकारण करून चौकशी सीबीआयच्या हातात द्यावी, असे म्हणणे म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी करावी अशी पहिली मागणी मीच केली होती. आणि महाराष्ट्र पोलीसांनी देखील अत्यंत जलद गतीने पारदर्शक तपास चालवला आहे. बिहारच्या येणाऱ्या निवडणूका यासाठी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच हे राजकीय षडयंत्र रचले जात असून याचा निषेधच करायला पाहिजे, अशा अशायाचे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. हे देखील वाचा- प्रभू श्रीराम कोणाच्या सातबारावर नाहीत, रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं अन् भक्ती वेगळी; जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर निशाणा

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट-

तसेच ज्या भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध इंग्रजी आणि हिंदी चॅनेल मधील एका पत्रकाराने भाष्य केले ते निंदनीय तर आहेच आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे अपमान करणार आहे. सत्य सामोरे येईल याबाबत शंका नाही. सत्य हे मिडीयाच्या माध्यमातून सामोरे आणले जात आहे हे भासवणे हा अत्यंत गलिच्छ राजकारणाचा प्रकार आहे. ह्या पत्रकाराला चर्चेत राहण्याची सवय असल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध असे उदगार काढले आहेत. त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध करेल, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.