Photo Credit- X

Malad Slab Collapsed: मुंबईतील मालाड येथील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कंत्राटदारासंह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. गुरुवारी ही घटना घडली. या घटनेची माहिती दिंडोशी पोलिसांनी दिली. (हेही वाचा- परेल येथील टाइम्स टॉवर इमारतीला लागली आग; कोणतीही जीवितहानी नाही)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मालाड येथील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळल्याने तीन कामगार जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंरतु उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी कंत्राटदारांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला.

मालाड येथील इमारतीचा स्लॅब कोसळला 

भारतीय न्याय संहिता कलम 106 (1) आणि 125 (ए) 125 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे दिंडोशी पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी सांगितले की, या घटनेत आणखी काही जण किरकोळ जखमी झाले आहे. दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणी माहिती दिली की, २३ व्या मजल्यावरील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत मजूर काम करत असताना अचानक स्लॅक कोसळला. या दुर्घटनेत काही मजूर गंभीर जखमी झाले तर काही जण किरकोळ जखमी झाले.

त्यांना तात्काळ जवळच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर तिघांचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कंत्राटदरांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला