
शॉर्टकट मारण्याचा मोह एकाच कुटुंबातील तिघांच्या जीवावर बेतला. मध्य रेल्वेच्या डोंबिवलीजवळील कोपर रेल्वे स्थानकात (Kopar Railway Station) झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी 3 च्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना एकाच वेळी दोन्ही बाजूने गाड्या आल्याने सर्वांचा गोंधळ उडाला आणि अपघातात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातामुळे दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रेल्वे अपघात टाळण्यासाठी चर्चगेट स्थानकात नवे बफर्स; कसे काम करणार हे बफर्स?
सुनीता भंगाळे, प्रीती राणे आणि लिवेश राणे अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. समाजाच्या स्नेहसंमेलनासाठी कल्याण येथे राहणारी प्रीती राणे दोन वर्षांचा मुलगा लिवेश आणि सासरे भास्कर राणे यांच्यासह कोपर येथे आली होती. मावशी सुनीता भंगाळे यांच्या घरी जाण्यासाठी हे सर्वजण कोपर पश्चिमेकडून पूर्वेला रेल्वे मार्ग ओलांडून जात होते. भारतीय रेल्वे ट्रॅकमॅनच्या सोबतीला GPS यंत्रणा, अपघात 70% आटोक्यात ठेवण्यात रेल्वेला यश देतोय 'हा' प्रयोग
पुलावरुन न जाता शॉर्टकट मारण्याचा हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला. रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक एकीकडून कल्याणकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस तर दुसरीकडून मुंबईकडे जाणारी फास्ट लोकल आली. त्यामुळे चौघांचाही गोंधळ उडाला आणि ते दोन रुळांच्या मधोमध थांबले. मात्र जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये सुनीता भंगाळे यांचा पदर अडकला आणि त्या गाडीखाली ओढल्या गेल्या. त्यांच्यासोबत प्रीती आणि तिचा मुलगा लिवेशही ओढला गेला आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत सासरे भास्कर राणे किरकोळ जखमी झाले आहेत.