
पार्सलमधून (Parcel) मौल्यवान वस्तू चोरल्याप्रकरणी (Theft) कुरिअर फर्मच्या कर्मचाऱ्यासह तिघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. पार्सलमधून मौल्यवान वस्तू काढून घेतल्यानंतर संशय येऊ नये म्हणून आरोपींनी ते पॅक केले आणि रिकामे पार्सल ग्राहकांपर्यंत पोहोचवले, असे मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून चार लॅपटॉप, दोन आयफोन आणि 3.5 लाख रुपये किमतीच्या इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. रमजान शेख, देवेंद्र सिंग, अजित कुमार सिंघी आणि तेजस आंबेकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी शेख हा वडाळा येथील रहिवासी असून तो एका कुरिअर फर्ममध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला होता.
गोरेगाव येथे राहणारा सिंग आणि चिंचपोकळी येथील सिंघी हे दोघे खासगी कंपनीत एकत्र काम करतात. तेजस नागपाडा येथे राहतो आणि दक्षिण मुंबईत एका इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा परिसरात गोदाम असलेल्या कुरिअर कंपनीकडून ग्राहकांना रिकामे पार्सल पोहोचवले जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. हेही वाचा Raju Shetty On MVA: सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा शेतकर्यांच्या हिताशी काहीच संबंध नाही, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींची टीका
त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्याने शुक्रवारी वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शेखने नवीन लॅपटॉप आणि आयफोन त्याच्या मित्रांना विकल्याचे पोलिसांना आढळून आले, असे पोलिस निरीक्षक इंद्रजीत मोरे यांनी सांगितले. शेखला एकदा पार्सलमध्ये महागड्या मौल्यवान वस्तू आढळल्या.
तेव्हा त्याने मौल्यवान वस्तू काढून टाकल्या आणि पार्सल पुन्हा पॅक केले जेणेकरून कोणालाही त्याचा संशय येऊ नये, असे मोरे म्हणाले. पोलिसांच्या पथकाने शेखचा शोध घेत शनिवारी वडाळा परिसरातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून अन्य आरोपींची नावे उघड केली आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून चार लॅपटॉप आणि दोन आयफोन जप्त करण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले.