Sharad Pawar (PC - ANI)

Sharad Pawar On BJP: अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिंदे सरकारशी हातमिळवणी करत शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा झटका दिला आहे. अशातचं अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी रविवारी तसेच आज देखील शरद पवार यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. परंतु, आता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपसोबत जायचा प्रश्नच उद्भवत नाही. लोक येऊन भेटले तरी भूमिकेत बदल होणार नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवार यांनी दिली आहे.

शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, अजित पवार आणि समर्थक आमदार शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी आज पुन्हा वायबी चव्हाण सेंटर येथे गेले होते. मात्र, शरद पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे. (हेही वाचा - NCP Crisis: शरद पवार यांच्या भेटीसाठी Ajit Pawar समर्थक आमदारांसह पुन्हा वायबी सेंटरला; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं चाललंय तरी काय?)

दरम्यान, आज वायबी सेंटर येथे अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, अनिकेत तटकरे, सुनील टिंगरे, अतुल बेनके, अमोल मिटकरी, इंद्रनील नाईक, विक्रम काळे, सरोज अहिरे, राजु कारेमोरे, सुनील शेळके, दत्तामामा भरणे, संजय शिंदे, अण्णा बनसोडे, संजय बनसोडे, या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

तपाथी, महाराष्ट्राच्या राजकारणातील उलथापालथीनंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या गेल्या दोन दिवसांपासूनच्या हालचालींमुळे राष्ट्रावादीचे राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील गोंधळात पडले आहेत. दरम्यान, रविवारी प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतना शरद पवार यांच्याशी बातचीत झाली असून राष्ट्रवादी एकत्रच ठेवण्याचा प्रस्ताव दिला असल्याचं सांगितलं.