Sharad Pawar vs Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुन्हा एकदा आपल्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांसह थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुंबई येथील वाय.बी. सेंटर (YB Center) येथे हे सर्व आमदार आणि अजित पवार गट पोहोचला असून, शरद पवार यांच्या आगमनाची प्रतिक्षा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चाललंय तरी काय? असा प्रश्न राज्यातील राजकीय विश्लेषकच नव्हे तर खुद्द पक्षातील कार्यकर्त्यांनाही पडला आहे. अजित पवार यांनी पक्षात बंड केले काय, त्यांनी थेट सरकारमध्ये सहभाही होत आपल्या समर्थकांसोबत मंत्रीपदाची शपथ घेतली काय हे सर्वच अनाकलनीय घडताना दिसत आहे.

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. काही झाले तरी आपण आपली पुरोगामी भूमिका सोडणार नाही. जे आमदार गेले त्यांबद्दल आपल्याला काहीही बोलायचे नाही. आपण थेट जनतेमध्ये जाऊ. लोकांच्या कोर्टात दाद मागू, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यांनी नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात थेट एक सभाही घेतली. त्यानंतर त्यांनी पुढचा कार्यक्रमही निश्चित केला. (हेही वाचा, Pawar Vs Pawar: राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनापूर्वी म्हणून आज अजित पवार गट पोहचला शरद पवारांच्या भेटीला ! (Watch Video))

ट्विट

दरम्यान, अजित पवार यांचे आपल्या समर्थकांसह थेट शरद पवार यांच्या मुंबई येथील घरी दाखल झाले. आपल्या काकी (शरद पवार यांच्या पत्नी) प्रतिभा पवार यांच्यावर मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेनंतर आपल्या आंतर्मनाला वाटल्याने आपण त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो, असे अजित पवार यांनी जाहिररित्या सांगितले. दरम्यान, अजित पवार गटातील आमदारांनी शरद पवार यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण, शरद पवार यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे बंडखोर आमदारांची गोची झाली आहे. आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीसाठी बंडखोर आमदारांचा गट वायबीसेंटर येथे दाखल झाला आहे. त्यामुळे आजच्या भेटीबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमके काय घडते याच्या तपशीलाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.