Ajit Pawar | Twitter

महाराष्ट्रामध्ये शिवसेना पाठोपाठ एनसीपी (NCP) पक्ष फूटला आहे. दोन आठवड्यांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्त्वाखाली काही आमदार फुटले आहे. त्यांनी सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आज या गटाने शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी मीडीयाशी बोलताना शरद पवार हे आमचे दैवत आहेत आणि पक्ष एकसंध रहावा म्हणून विचार करावा असं आम्ही त्यांना सांगितलं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान यावर शरद पवार काहीही म्हटलं नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

एनसीपीमध्ये भाजपासोबत जाण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. त्यापैकी एक अजित पवारांचा आहे. आज त्यांनी पुन्हा शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्याला आशिर्वाद द्यावा असं म्हटलं आहे. अजित पवार गेल्यानंतर शरद पवार यांची प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक सुरू आहे.

शरद पवारांना भेटण्यापूर्वी अजित पवार गट देवगिरी वर एकत्र भेटले होते. त्यानंतर पूर्वसूचना न देता वाय बी चव्हाण सेंटर वर शरद पवारांच्या भेटीला पोहचले. अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेमध्ये सहभागी होताना 9 एनसीपी आमदारांना मंत्रीपद मिळाले आहे. Sharad Pawar Faction: शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीसा, घ्या जाणून .

शरद पवार यांच्या भेटीला पोहचलेल्यांमध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, सुनील तटकरे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, नरहरी झिरवळ, संजय बनसोड, हसन मुश्रीफ  यांचा समावेश होता. 17 जुलै म्हणजे उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. विधिमंडळात अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार असल्याने ही भेट महत्त्वपूर्ण असणार आहे. विधिमंडळात एनसीपीचे किती आमदार उद्या सत्ताधारी आणि विरोधक बेंचवर बसणार यामधून चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. व्हिपचा आदेश न मानणं हे आमदारांच्या आमदारकीवर बेतू शकतं, पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते त्यामुळे सध्या एनसीपी एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.