महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार यात मला शंका वाटत नाही - शरद पवार
NCP Chief Sharad Pawar (Photo: Facebook)

महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) 5 वर्षे टिकणार यात मला शंका वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे संमिश्र सरकार असून हे सरकार पाच वर्षे चालेल. या सरकारचे नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत. ते कधीही दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका कार्याक्रमात बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकराचं काम व्यवस्थित सुरू आहे. सध्या सर्वकाही नीट चालू आहे. त्यामुळे आता मी लांब झालो. 'या सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही,' असंही शरदा पवार यांना यावेळी स्पष्ट केलं आहे. मात्र कधी काही काही मदत लागली, तर मी त्यांच्या पाठीमागे उभं राहतो. त्याव्यतिरिक्त माझा सरकारशी काहीही संबंध नाही, असंही पवार यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला कमीपणा वाटतो का? मनसे नेते अमेय खोपकर यांचा नवाब मलिकांना सवाल)

दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी शिक्षणावर तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही चर्चा केली. देशातील 58 ते 60 टक्के लोक शेती व्यवसायावर जीवन जगतात. शेतकऱ्यांनी शेतीवर अवलंबून राहणं कमी केलं पाहिजे. कुटुंबातील केवळ एकानेचं शेती करावी, असा सल्लाही यावेळी शरद पवारांनी दिला आहे. मी वयाच्या 80 व्या वर्षांत पदार्पण करतोय. त्यामुळे आता थांबायचं, आता कसलं व्हिजन बघत बसायचं. व्हिजन पाहण्याचं काम आता नव्या पिढीकडे द्यायचं आणि आपण फक्त त्यांच्याकडे पाहतं राहायचं. मी आता तेचं करतो. फक्त जेव्हा त्यांना आपली गरज लागेल किंवा ते आपल्याला सल्ला विचारतील तेव्हाचं आपण त्यांना सल्ला द्यायचा, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.