Delhi-Mumbai Akasa Air Flight Diverted: दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या अकासा एअरच्या फ्लाइट (Akasa Air Flight) ला सुरक्षा सूचना मिळाल्याने वैमानिकांनी सोमवारी विमान अहमदाबादकडे वळवले. गेल्या तीन दिवसांत धोक्याचा इशारा मिळालेले हे मुंबईहून जाणारे तिसरे विमान आहे. अकासा एअर फ्लाइट क्यू मध्ये 186 प्रवासी, एक अर्भक आणि सहा क्रू सदस्य होते. मुंबईला जाणाऱ्या या विमानाला सुरक्षा सतर्कतेचा इशारा मिळाला आहे, असे आकासा एअरच्या प्रवक्त्याने सांगितले. हे विमान सकाळी 8.50 च्या सुमारास निघाले होते आणि सकाळी 10.45 वाजता मुंबईत उतरणार होते.
निर्धारित सुरक्षा आणि सुरक्षा प्रक्रियेनुसार, विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले. कॅप्टनने सर्व आवश्यक आपत्कालीन प्रक्रियेचे पालन केले आणि सकाळी 10.13 वाजता विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. (हेही वाचा -DGCA कडून Delhi ते San Francisco फ्लाईट 24 तास उशिरा उडवणार्या Air India ला कारणे दाखवा नोटीस जारी)
सुरक्षा धोक्यांमुळे गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या एअरलाइन्सच्या अनेक फ्लाइट्सने आपत्कालीन लँडिंग केले आहे. रविवारी, 306 प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह मुंबईला जाणारे विस्तारा फ्लाइट, 'हस्तलिखित' बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर आणीबाणीच्या अलर्टमध्ये शहरात उतरले. (हेही वाचा - नक्की वाचा: Air India चं Delhi-San Francisco विमान 20 तास उशिरा उडाले; एसी विना विमानात बसलेल्या अनेकांना आली भोवळ!
शनिवारी संध्याकाळी अशीच एक घटना घडली, ज्यामध्ये वाराणसी-दिल्ली इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी मिळाली. ज्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ प्राधिकरणांनी त्वरित कारवाई केली. चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला आणखी एक बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यानंतर सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानाला आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले.