Mumbai: पैशाच्या व्यवहारावरून वाद; ग्राहकाने चाकूने वार करून केली फळ विक्रेत्याची हत्या
Murder Image used for represenational purpose (File Photo)

Mumbai: मुंबईतील नळ बाजार परिसरात पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादात फळ विक्रेत्याची एका ग्राहकाने खून केला. हत्येनंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. परराज्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली.

गुन्हे शाखेचे विनायक चौहान म्हणाले, “आरोपी सोहराब कुरेशी (वय, 25) याचा एका फळ विक्रेत्याशी पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला. त्यानंतर त्याने फळ विक्रेते बाबूजी कुरेशी (वय, 55) आणि त्यांचा मुलगा छोटू कुरेशी (वय, 30) यांच्यावर चाकूने वार केले. यात फळविक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच छोटू जखणी झाल्याने त्याला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वाचा - BSF जवानाने मेसमध्ये आपल्या सहकाऱ्यांवर केला अंदाधुंद गोळीबार; 5 जवानांचा मृत्यू, अनेकजण जखमी)

अधिकाऱ्याने सांगितले की कलम 302 (हत्येची शिक्षा), 307 (हत्येचा प्रयत्न), 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करण्यासाठी शिक्षा), 504 (शांतता भंग केल्याबद्दल), 506 (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा), या अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. त्यानंतर त्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने सापळा रचून त्याला मालाडच्या मालवणी परिसरातून अटक केली. अटकेवेळी तो मुंबईतून उत्तर प्रदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.