Thane Water Cut: ठाणे येथील काही भागात 25 फेब्रुवारीला महत्वाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने 24 तास पाणी कपात असणार आहे. ठाणे महापालिकेने गुरुवारी असे म्हटले की, ठाण्यातील काही भागात शुक्रवारी (25 फेब्रुवारी) रात्री 9 वाजल्यापासून ते शनिवारी (26 फेबुवारी) रात्री 9 वाजेपर्यंत पाणी नसणार आहे. यादरम्यान दुरुस्तीच्या कामासह अन्य कामे सुद्धा पाणी वितरण आणि इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून केले जाणार आहे.('मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षा’चा शुभारंभ; '2027 पूर्वी BEST च्या ताफ्यात 100 टक्के Electric Buses असतील'- आदित्य ठाकरे)
महापालिकेने असे म्हटले की, टीएमसी स्वत: योजना तयार करुन पाण्याचे वितरण ठाणे शहरात केले जाईल. ज्या ठिकाणी पाण्याचा फटका बसणार आहेत ती म्हणजे घोडबंदर रोड,पाटीलपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हनंद, विजयानगरी, गायमुख, बाळकुम, कोळशेत, आझाद नगर आणि गांधीनगर.(BJP On BMC: मुंबईत 8 दिवसांत हॅकर पॉलिसी लागू करणार, भाजप नेत्याचा इशारा, जाणून घ्या हॅकर पॉलिसी म्हणजे काय ?)
महापालिकेने पुढे असे सांगितले की, रितू पार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, समतानगर, आकृती, दोस्ती, जोहानसन, इटरनिटी, कळवा आणि मुंब्रा येथील काही भागात शुक्रवारी सकाळी 9 वाजता ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.टीएमसीने नागरिकांना असे आवाहन केले आहे की, पाणी कपातीमुळे ते आधीच भरुन ठेवावे. तसेच कमी दाबाने पाण्याचा पुरवठा पुढील 1-2 दिवस केला जाईल असे ही सांगण्यात आले आहेत.