Thane Water Cut: ठाण्यात येत्या शुक्रवारी 24 तासांसाठी पाणीकपात; शहरातील 'या' भागांत होणार पाणी पुरवठा खंडीत
Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

ठाणे (Thane) शहरातील रहिवाशांना पाणी कपातीला समोरे जावे लागणार आहे. मेट्रोचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी आणि इतर भागातील डागडुजीच्या कामं हाती घेतल्याने येत्या शुक्रवारी (18 सप्टेंबर) पाणी कपात केली जाणार असल्याचे नागरी समितीने सांगितले. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, नागरी समिती आणि शहाद टेमघर जल संसाधन (Shahad Temghar Water Resource) कंपनी यांच्याकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारपासून खंडीत करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने सांगितले आहे. शहरातील अनेक भागांत शुक्रवारी (18 सप्टेंबर) सकाळी 9 ते शनिवारी (19 सप्टेंबर) सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा खंडीत केल्यामुळे माजिवाडा जंक्शन (Majiwada Junction) जवळील लाईन 4 मेट्रोचे काम करणे शक्य होणार आहे.

घोडबंदर रोडला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन माजिवाडा मेट्रो स्टेशन दरम्यान येत असल्याने STEM कडून मुख्य पाईपलाईन शिफ्ट करण्याचे काम आम्हाला आधी करावे लागणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी सांगितले आहे. आम्ही समांतर पाईपलाईन टाकली असून शुक्रवारी ते काम पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (Mumbai Water Cut: मुंबई तलावक्षेत्रात पाणीसाठा वाढल्याने 21 ऑगस्टपासून 10% पाणीकपात; 85% जलसाठा उपलब्ध)

MIDC कडून पाणीपुरवठा होणारे भाग सोडून शहरातील इतर भागात शुक्रवार सकाळ ते शनिवार सकाळपर्यंत पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. यात घोडंबदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, गांधी नगर, इटरनेटी मॉल जवळील परिसर, जॉनसन अँड जॉनसन, समता नगर, इंदिरा नगर, लोकमान्य नगर, श्रीनगर, ठाणे जेल, साकेत, उथळसर, मुंब्रा रेतिबंदर आणि कळव्या जवळील भागांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यासाठी एक दिवस पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी सांगितले. या दरम्यान साकेत ब्रिजजवळील मुख्य वॉल्व आणि बाळकुम जवळील वॉल्व दुरुस्त करण्यात येणार आहे. तसंच घोडबंदर रोडवरील इलेक्ट्रीक पॅनल देखील बदलण्यात येणार असल्याची माहिती टीएमसीच्या इंजिनियर्सकडून देण्यात आली आहे.

पाणी कपात होणार असल्यामुळे पाणी भरुन ठेवण्याचे आणि जपून वापरण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. तसंच काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पुर्ववत करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान मुंबई मेट्रो लाईन 4 ही घोडबंदर रोडवरील कासारवडवलीपासून वडाळापर्यंत असणार आहे. हा पट्टा 32.32 किमी इतका लांब असून यामध्ये 32 स्टेशन्स असणार आहेत. हा मार्गाचे बांधकाम 2022 पर्यंत पूर्ण होईल, अशी आशा आहे. हा मार्ग इस्टन एक्स्प्रेस हायवे, मेट्रो लाईन 5, लाईन 2B, लाईन 6 आणि लाईन 8 यांना जोडेल.