Thane News: उच्चभ्रू परिसरात अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना डोंबिवलीतून अटक, आरोपींकडून अडीच लाख जप्त, परिसरात मोठी खळबळ
Drugs | (Photo Credits: Twitter/ ANI)

Thane News: डोंबिवलीत गुन्हेगारांच्या घटना वारंवार वाढताना दिसत आहे. डोंबिवलीत एका हाय प्रोफाईल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. खोणी येथे अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केले आहेत. खोणी पलावा परिसरात पोलिसांना छापा टाकून या घटनेचा पर्दाफाश केला आहे. अमली पदार्थ सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींकडून पोलिसांनी अडीच लाख रुपये देखील जप्त केले आहे. अर्शद करार खान (28) आणि सदाबुद्दीन सय्यद (28) अशी आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मानपाड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एमडी नावाचं ड्रग्स आणि अडीच लाख रुपये पोलिसांनी जप्त केली आहे. पलावा परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेची खबर दिली. पोलिसांनी परिसरात छापा टाकून दोन्ही तरुणांना मानपाडा पोलिस ठाण्यात आणले असून त्यांची चौकशी सुरु केली. आरोपींनी किती किलो ड्रग्ज कोणाला दिले? या संदर्भात चौकशी सुरु केली आहे.

या काळात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी केली जाते.  डिसेंबरच्या अखेरीस पार्ट्यांटे सत्र सुरु होते, त्या दरम्यान तरुण पार्ट्यांमध्ये अनेक तरुण मंडळी व्यसन करतात, अंमली पदार्थांचाही समावेश असतो. त्यामुळे पोलिस आता अॅक्शन मोडवर आहे. नागरिकांच्या सर्तकेमुळे पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. अंमली पदार्थ सापडल्याने परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात चिंता वाढताना दिसत आहे. मानपाड पोलिस अधिकारी या घटनेची संपुर्ण चौकशी करत आहे.