ठाणे: कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता माजिवाडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये 'या' भागात 18 मेपर्यंत लॉकडाऊनचे नियम कडक!
Coronavirus in India (Photo Ctredits: IANS)

मुंबईसह नजिकच्या परिसरामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आता ठाणे शहरामध्ये माजिवाडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 1,2,3 व 8 मधील क्षेत्र आता 15 मेच्या रात्री 12 वाजल्यापासून 18 मे पर्यंत पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या भागामध्ये मागील काही दिवसांपासून रूग्ण संख्या वाढत असल्याने आता हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिक या भागामध्ये लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. अशामुळे सामान्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकतो परिणामी प्रशासनाने या भागात आता 3 दिवसांसाठी लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या काळात दूध, औषध, किराणा माल, अन्नधान्याची दुकानं खुली राहणार आहे. इतर स्थायी दुकानांना ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी मुभा दिली जाणार आहे.

माजिवाडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 1,2,3 व 8 मध्ये कोरोनाचा धोका पाहता नागरिकांनी एकत्र घराबाहेर पडू नये. महत्त्वाच्या कामासाठी आल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळा असे सांगण्यात आले आहे. आता नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी या भागात पोलिसांची कुमक असेल असेही ठाणे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ठाणे: कल्याण येथे दोन चिमुकल्या बाळांसह 51 जण कोरोनामुक्त

ठाणे पालिका प्रशासनाची माहिती

ठाण्यामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये चिकन, मटण, मासे विक्री करणारी स्थायी आस्थापनातील दुकानं बंद राहतील. तर यासोबतच बेकरी देखील बंद ठेवली जाणार आहे. मात्र त्यांच्याकडून घरपोच सेवा दिली जाऊ शकते. ठाण्यात 3287 कोरोनाबाधित रुग्ण असून आतापर्यंत 36 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजारांच्या पार गेला आहे.