Laxman Sheth Murdeshwar (Photo Credits: Twitter)

[Poll ID="null" title="undefined"]गेली अनेक वर्षे आपल्या वेगळेपणामुळे सुप्रसिद्ध झालेल्या ठाण्यातील (Thane) मामलेदार मिसळचे मालक (Mamledar Misal Owner) लक्ष्मण शेठ मुर्डेश्वर (Laxman Sheth Murdeshwar) यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. लोकमतने दिलेल्या बातमीनुसार ते गेले 15 दिवस आजारी होते. मात्र आज अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून ठाणे परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच त्यांचे ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदार मिसळ दुकान देखील नुकतेच बंद करण्यात आले आहे. आज दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. मूळचे कर्नाटक चे असलेल्या मुर्डेश्वर यांनी 1946 साली ठाण्यातील तहसील कार्यालयाबाहेर हे मिसळचे दुकान सुरु केले होते. त्यानंतर 1952 मध्ये वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी लक्ष्मणशेठ यांनी समर्थपणे पेलली.

महाराष्ट्रातील प्रत्येक पदार्थ तसा जगप्रसिद्ध आहे. मात्र महाराष्ट्राची अस्स्ल मराठमोळा पदार्थ म्हणजे 'मिसळ.' महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील मिसळ प्रकार प्रसिद्ध आहे. तसेच मुंबईत अनेक ठिकाणची मिसळ प्रसिद्ध आहे. त्यातील सुप्रसिद्ध मिसळ म्हणजे ठाण्यातील मामलेदार मिसळ. ही मिसळ खाण्यासाठी दूरदूर वरुन लोक येतात. याशिवाय अनेक राजकीय नेते, मराठी कलाकारही या मिसळचे चाहते आहेत. अशा या मिसळला ब्रँड बनविण्यात मोलाचा वाटा असणा-या या मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण शेठ मुर्डेश्वर यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.हेदेखील वाचा- Urmila Matondkar Joins Shiv Sena: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांंचा 'मातोश्री' वर शिवसेना पक्षामध्ये प्रवेश

काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.कोरोनाची लागण झाल्यामुळे ते गेले 15 दिवस आजारी होते असे त्यांनी सांगितले आहे.

एका साध्यासुद्या तहसीलदार मिसळला मामलेदार मिसळ बनविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाने ग्रस्त होते. यातच आज सकाळी त्यांचे निधन झाले.

मामलेदार मिसळ ही ठाण्याची जणू ओळखच आहे. तुम्ही ठाण्यात असाल तर मामलेदारची झणझणीत मिसळ चाखली असं होणारच नाही. त्यांच्या मिसळ बनविण्याच्या वेगळेपणामुळे आणि चवीमुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. मात्र आज लक्ष्मणशेठ यांच्या निधनाच्या बातमीने या परिसराता दु:खाचा डोंगर कोसळला असून यांचे दुकान बंद करण्यात आले आहे.