#Update Thane Fire: कापूरबावडी येथील लेक सिटी मॉल मध्ये आग; दोन जण जखमी
Thane Lake City Mall Fire (Photo Credits : ANI)

ठाणे (Thane) येथील कापूरबावडी (Kapurbavadi)  परिसरात स्थित लेक सिटी मॉलच्या (Lake City Mall)  पहिल्या माळ्यावर आज , 15 फेब्रुवारी रोजी दुपारी आग लागल्याचे समजत आहे, बाल्कम अग्निशमन स्थानकाच्या (Balkum Fire Station)  जवळ हा मॉल असल्याने या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र यात दोन जण जखमी झाले असुन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाने ही आग आता विझवली असुन परिस्थिती आटोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.

लेक सिटी मॉल हा ठाणे पश्चिम मध्ये स्थित आहे. तसे हे बरेच वर्दळीचे ठिकाण आहे आणि आज शनिवार असल्याने याठिकाणी भारतात नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती, मात्र सुदैवाने आग लागताना तिचे स्वरूप भीषण नसल्याने कोनतीही हानी झालेली नाही. असं असलं तरी आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

ANI ट्विट

दरम्यान, मुंबई मध्ये देखील मागील काही महिन्यात आगीच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. याच आठवड्यात अंधेरी येथील रॉल्टा टेक्नोलॉजी पार्क येथे भीषण अशी तिसऱ्या स्तरावरील आग लागली होती. साधारण दोन ते तीन तास या ठिकाणी बचावकार्य सुरु होते ज्यांनंतर आग आटोक्यात आली होती. तर काल, 14 फेब्रुवारी रोजी सुद्धा कळवा रेल्वे स्थानकाच्या अगदी शेजारीच गटातरीत सुक्या कचऱ्याला आग लागली होती.