ठाणे: मुंब्रा परिसरातील खान कंपाऊंड येथील 7 गोदामे आगीत जळून खाक

ठाणे (Thane) येथील मुंब्रा (Mumbra) परिसरातील शिळफाटाजवळील खान कंपाऊंड येथे 7 गोदामांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रात्री 2 च्या सुमारास घडली आहे. अग्निशशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहे. या भीषण आगीत सातही गोदामे जळून खाक झाली आहेत. गोदामाला अचानक आगली आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच ही आग कशामुळे आग लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

रात्री 2 च्या सुमारास खान कंपाऊंड येथे  7 गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सकाळपर्यंत या आगीला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत सात गोदामे जळाली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. शिळफाटा परिसरात सतत आगीचे प्रकार घडत असल्यामुळे येथील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. हे देखील वाचा- मुंबई सेंट्रल येथील नागपाडा परिसरात भीषण आग; 5 जण गंभीर जखमी (पहा व्हिडीओ)

नुकतीच सोमवारी पुणे येथील बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीवरील  भीषण आग लागल्याची घटना घडली होती. ही इमारत गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. यामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही.