Accident (PC - File Image)

ठाणे घोडबंदर (Ghodbunder Road Thane) रोड वर रिक्षा डिव्हायडरला आदळून पेटल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. दरम्यान या रस्ते अपघातानंतर  महिला प्रवासीचा मृत्यू झाला असून रिक्षा चालक जखमी आहे. ही घटना गायमुख (Gaimukh) भागातील असून पहाटे 5.45च्या सुमाराची ही घटना आहे.

PTI वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, ऑटोरिक्षा ठाणे शहराकडून भायंदर कडे जात असताना रिक्षा चालकाचा वाहनावरील कंट्रोल सुटला. त्यानंतर रिक्षा नियंत्रणाबाहेर गेल्याने थेट डिव्हायडर वर आदळली. त्यानंतर रिक्षाने पेट घेतला. अशी माहिती ठाणे पालिकेच्या रिजनल डिझास्टर मॅनेजमेंट सेल चे प्रमुख अविनाश सावंत यांनी सांगितले आहे. नक्की वाचा: Pune-Nashik Highway Accident: पुणे-नाशिक हायवे वर खेड जवळ 8 महिलांना कारची जबर धडक; 5 ठार 3 जखमी .

पहा ट्वीट

रिक्षा अपघातामध्ये महिला पॅसेंजर आत अडकली. पेटलेल्या रिक्षात तिचा जळून मृत्यू झाला. ड्रायव्हरचं नाव राजेश कुमार आहे. 45 वर्षीय राजेशला काही ठिकाणी भाजले आहे. असे ऑफिशिएल सांगतात. रिक्षाचा देखील भुगा झाला आहे.

दरम्यान रिक्षा पेटल्याच्या घटनेनंतर स्थानिक फायरमॅन आणि RDMC team घटनास्थळी धावून आली. मात्र त्यामध्ये 30 मिनिटांचा वेळ गेला. त्यानंतर ड्रायव्हरला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.