Pune-Nashik Highway Accident: पुणे-नाशिक हायवे वर खेड जवळ 8 महिलांना कारची जबर धडक; 5 ठार 3 जखमी
Accident (PC - File Image)

पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) काल (13 फेब्रुवारी) एक भीषण अपघात झाला आहे. रात्री 11 च्या सुमारास खेड (Khed) जवळ एका कारने 8 महिलांना धडक दिली. या धडकेमध्ये 5 महिलांचा मृत्यू झाला आहे तर 3 जणी जखमी आहेत. जखमींवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या पोलिस अपघात घडवून आणणार्‍या कारचा शोध घेत आहेत.

लग्नामध्ये काम करण्यासाठी 17-18 महिला पुण्यात स्वारगेट मधून पीएमपीएमल बसने खेडला गेल्या होत्या. शिरोली फाट्याजवळ त्या उतरल्या. अंधारात रोड ओलांडताना वयस्कर महिला चाचपडत चालत होत्या. त्यावेळी पुण्याच्या दिशेने आलेल्या कारने 8 महिलांना जबर धडक दिली. या अपघातामध्ये 5 जणींचा जागीच मृत्यू झाला तर 3 जणींवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातानंतर कारचा चालक पुन्हा पुण्याच्या दिशेने पसार झाला आहे. खेड पोलिस चालकाचा सध्या शोध घेत आहेत.