Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील कल्याण (Kalyan) येथील भर बाजारात एका विवाहितेवर चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी महिलेचा मृत्यू झाला असून पोलिसांकडून या प्रकरणचा अधिक तपास सुरु होता. तर तपास केल्यावर तासाभरातच एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.

सनम असे महिलेचे नाव असून ती बाजारात आपल्या मित्रांना भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी दोन जणांनी दुचाकीवरुन येत तिला चाकूने भोकसून फरार झाल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. यामध्ये सनम हिचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी बाबू ढकणी नावाच्या आरोपीला अटक केली आहे. तर आता सनम हिच्या हत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे.

(ठाणे: कल्याण येथील APMC मार्केटमध्ये चाकूने वार करत विवाहितेची हत्या)

ढकणी आणि सनम यांनी मैत्री होती. मात्र या दोघांत काही कारणामुळे वाद झाले होते. तसेच सनम हिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. याचाच राग मनात धरुन ढकणी याने सनमवर हल्ला केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अधिक तपास अद्याप पोलिसांकडून सुरु आहे.