Thane Rape Case: अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कारप्रकरणी ठाण्यातील 19 वर्षीय तरुणाला अटक
Representational Image (Photo Credits: File Photo)

Thane Rape Case: अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnapping) आणि बलात्कार (Raping Minor Girl) केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला ठाणे शहर पोलिसांनी (Thane City Police) अटक केली आहे. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

कोपरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक दीपाली लंबाटे (Deepali Lambate)यांनी सांगितले की, पीडित युवतीची सोशल मीडियावर ठाणे महानगरपालिकेचे कंत्राटी कामगार असलेल्या आरोपीबरोबर मैत्री झाली होती. 30 ऑगस्ट रोजी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. (हेही वाचा -Dr. Babasaheb Ambedkar Memorial In Indu Mills: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला)

या प्रकरणाचा तपास केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीला धमकावून उस्मानाबादला नेल्याचे पोलिसांनी समजले. बुधवारी पीडितेची सुटका करण्यात आली. तसेच आरोपीला भारतीय दंड संहितेनुसार, कलम 376 अन्वये अटक करण्यात आली आहे. तसेच POCSO कायद्यातील तरतुदींनुसार आरोपीवर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचंही दीपाली लंबाटे यांनी सांगितलं आहे. देशात कोरोना विषाणूचं संकट असताना विविध ठिकाणाहून बलात्काराच्या घटना समोर येत आहे.